Search
Close this search box.
कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

मराठा आरक्षण आंदोलन ;शहरातील शाळा, महाविद्यालये , बाजारपेठ, वाहतूक कडकडीत बंद.

लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित 

अहमदपूर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समाज बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावे, सकल मराठा समाजावर गोळीबार, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, उपोषणकर्त्या बांधवांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी येथील शिवाजी चौकातून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रॅली काढून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन व मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालय ,बाजारपेठ कडकडीत बंद होते.

येथील शिवाजी चौकात सकाळी ८:३० वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सई दापके व माजी सैनिक बालाजी पांचाळ यांच्या हस्ते पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. यानंतर भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी हि रॅली थोडगा रोड ,महेश बँक ,बसवेश्वर चौक ,आंबेडकर चौक ,आझाद चौक ,मारुती मंदिर ,आंबेडकर पुतळा, सावरकर चौकातून ही रॅली नारे देत येथील शिवाजी चौकात आली.यावेळी येथे ठिय्या आंदोलन देण्यात आले. यानंतर मनोगत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम माने, प्रा. गोविंद शेळके ,प्रा. रोहिदास कदम, ज्ञानोबा भोसले, विनोद माने, सिद्धेश्वर लांडगे, नाना कदम, राजपाल जाधव, अँड. आनंद जाधव, सुप्रिया पवार ,प्रा. दत्ता गलाले, मुकेश पाटील ,धीरज भंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या शहरातील शाळा, महाविद्यालय ,व्यापारी प्रतिष्ठान ,आठवडी बाजार ,बस स्थानक ,वाहतूक सर्व काही अगदी कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. ही रॅली अगदी शांततेत व नारे देत वाजत- गाजत काढण्यात आली.सोमवारचा येथे आज आठवडी बाजार असूनही सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.यात अंतरवली येथील समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घ्यावे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्या जरांगे पाटील व बांधवांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला ,आरक्षण चळवळीतील शहीद बांधवांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे, सकल मराठा समाजावर अमानुष लाठी चार्ज गोळीबार व अश्रुधुराचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी सकल मराठा समाजात बरोबर आमदार बाबासाहेब पाटील ,माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील ,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,गणेशराव हाके पाटील,डॉक्टर गणेश कदम, सांबप्पा महाजन आदींसह शहरातील व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
4:50 pm, May 5, 2024
temperature icon 40°C
clear sky
Humidity 15 %
Pressure 1002 mb
Wind 15 Km/h
Wind Gust Wind Gust: 19 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:59 am
Sunset Sunset: 6:54 pm

Our Visitor

5 1 1 3 7 0
Total Users : 511370
Total views : 522880

Our Visitor

5 1 1 3 7 0
Total Users : 511370
Total views : 522880