तुमसर: शहरात पाण्याचे समस्येचे दिवसेंनदिवस प्रमाण वाढताना दिसत आहे.त्यातच शहरातील विविध भागात मागील काही महिन्यांपासून नगरपरिषद अंतर्गत येत असलेली विविध बोरिंग,विविध नळे बंद पडलेले असून भंगार अवस्थेत आढळून येताना दिसत आहे.
असाच प्रकार तुमसर शहरातील गुरुनानक नगर,गांधी नगर आंबेडकर नगर,जुना बस स्टॉप चौक, जगनाडे नगर,येथे आढळून आलेला आहे.या भागातील नळे,बोरिंग मागील काही महिन्यांपासून बंद होती. स्थानिक नागरिकां द्वारे तक्रार करूनही समस्येचे निराकरण काही होईना.
वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपरिषदेमार्फत दुर्लक्ष केले जात असल्यामुळे विविध प्रभागातील नागरिकांनी या संबंधित माहिती इंजि. सागर गभने यांना दिली.यावर सागर गभने यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांसोबत प्रत्येक जागेवर जाऊन चौकशी केली. सागर गभने यांनी पुढाकार घेत आलेल्या सर्व भागातील पाण्याच्या समस्येचे आठवड्याभरात निराकरण केले. शेवटी जनतेच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांना फळ मिळतेच.जनतेने गभने यांचे आभार मानले.