उपसंपादक / राठोड रमेश पंडित
लातूर :- गंगाहिप्परगा येथे मूलभूत सुविधा (2515) अंतर्गत 10 लक्ष रुपये कामाचे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री हाके यांनी मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, जिल्हाचे पालकमंत्री तसेच सर्व विभागाचे मंत्री यांच्याशी माझे चांगले मैत्रीपूर्व संबंध असल्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावाला आवश्यक त्या सुविधा पोहोचण्याचे काम करणार असे मत व्यक्त केले.
यावेळी सरपंच मीना लक्ष्मण कोमले, उपसरपंच नागेश बेंबडे, माजी सरपंच महादेव टाकळे, ग्रा. प. सदस्य अरुण कदम, सुरेश अप्पा कडवदे, संगम काडवदे, चंद्रकांत चामवाड, गंगाराम पोले, नामदेव मांडुरके, महेश सुरकुटे, विश्वनाथ स्वामी, शरद देवकते, सोमनाथ मदने, आदित्य मदने, व्यंकट फाजगे, प्रताप फाजगे, धोंडीबा शेकापुरे,मंगेश कदम, गोपीनाथ श्रीमंगले, रमेश मदने, शंकर काळवदे, अजय भालेराव जळबा टीमकीकर, साधू कोमले, तुकाराम कदम, बालाजी बारोळे, उद्धव कोंमले, गोपाळ चामवाड सिद्राम मासुळे आदी उपस्थित होते.