आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीचा महत्त्वाचा टप्पा : सुनील मेंढे
भंडारा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. मध्यमवर्गीयांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या या अर्थसंकल्पात युवक, बेरोजगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांचा सर्वांगीण विचार करून नियोजन करण्यात आलेले दिसते. आरोग्य व्यवस्था बळकट करणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर देणे ही या अर्थसंकल्पाची प्रमुख…