अहमदपूर व चाकुर तालुक्यातील खरीप पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे भाजपाची मागणी.
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित लातूर:- अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या संकटात सापडल्याने खरीप हंगामातील पिकाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली…