प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीला आज आठवण करण्याची गरज आहे ती प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची. कारण आज आपल्याला नव्या समाजद्रोही , धर्मद्रोह्यांशी लढायचं आहे. त्यासाठी लागणारे वैचारिक व नैतिक बळ देण्याचे सामर्थ्य प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये व कार्यात आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे प्रबोधनाच्या चळवळीतील आघाडीचे नाव. ज्यांनी आपल्या तडफदार वाणी बरोबर धारदार लेखणीने धर्म,…