कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तुमसर पोलीसांची अवैधरित्या रेती, प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखु, दारु चा व्यवसाय करणा-यांवर धडक कारवाई “एकूण सात लक्ष बारा हजार नऊशे पंच्याऐंशी रु. चा मुद्देमाल जप्त.”
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर: पोलीस स्टेशन तुमसर येथे दिनांक 04/07/2026 रोजी कोंबींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करित असतांना तुमसर पोलीसांनी विविध अवैध धंद्यावर रेड करुन एकुन 7,12,985/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरच्या कार्यवाही मध्ये तुमसर पोलीस स्टेशन येथील पो.नि. सुभाष बारसे, पो. नि. आघाव सा. तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रितम येवले, पो.उपनि. मनोहर शहारे, पो.हवा….